Breaking News

पनवेल परिसरातील अपघातांत एक ठार; तीन जण जखमी

पनवेल : वार्ताहर

पळस्पे परिसरात झालेल्या दोन अपघातामध्ये एक ठार व तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. पनवेल जवळील पळस्पे येथील शिरढोण गावाच्या हद्दीत असलेल्या साईकृपा हॉटेल जवळ गोवा-मुंबई महामार्गावर (एमच-05-के-9309) ट्रकचालक मासुम नुरमोहम्मद करबेलकर (वय 27) याने पुढे चालत असलेल्या ट्रेलर (एमएच-48-एवाय-7048) यास पाठीमागून धडक दिली. याचवेळी बाजूने येत असलेल्या इको कार (एमएच-06-सीडी-2386) यागाडीलाही धडक मारली. या अपघातात नितीन भोंगे (वय 24) व जयराम रावते हे किरकोळ जखमी झाले आहेत तसेच त्यांच्या ट्रक केबिनमध्ये झोपलेला यशवंत सोनजी फडवले (वय 27) हा गंभीररित्या जखमी होवून मयत झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दुसर्‍या घटनेत पळस्पे फाटा येथे ट्रक (एमएच-12-एमएक्स-2395) ने एका (एमएच-01-बीयु-9779) गाडीस धडक दिल्याने या गाडीतील एक जण जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

Check Also

विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय …

Leave a Reply