पंढरपूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसचे आमदार हनुमंतराव डोळस (58) यांचे मंगळवारी (दि. 30) मुंबईतील सैफी रुग्णालयात निधन झाले. पोटाच्या कर्करोगाने आजारी असलेल्या डोळस यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून उपचार सुरू होते, मात्र त्यांची प्रकृती उत्तरोत्तर खालावत गेली आणि अखेर मंगळवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.
माळशिरस तालुक्यातील दसूर हे डोळस यांचे मूळ गाव असून, त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, एक भाऊ व चार बहिणी असा परिवार आहे.