खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त
संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने खांदा कॉलनीत शनिवारी (दि. 19) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. खांदा कॉलनी सेक्टर 13 येथील पाण्याच्या टाकीजवळ होणारे हे आरोग्य शिबिर सकाळी 10.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत असणार आहे. या शिबिरासाठी खारघर येथील दांडेकर हॉस्पिटलचे सहकार्य लाभणार असून डॉ. माधुरी दांडेकर व डॉ. राहूल दांडेकर हे या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या वेळी बॉडी हेल्थ चेकअप, डायबिटिज, ब्लड प्रेशर, रक्त तपासणी अशा तपासण्या होणार आहेत.