Breaking News

खोपोलीतील आदिवासींसाठी पाण्याची टाकी उभारणी कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त

निफाणवाडी हा आदिवासी कुटुंबांचा अधिवास असलेला पाडा रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील सावरोली नजीक असून या ठिकाणी टाटा स्टीलने निफाणवाडीतील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याची सुविधा पुरवण्यासाठी 20 हजार लिटर  क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यासाठी पायाभरणी केली. यामुळे निफाणवाडी गावातील 130 पेक्षा जास्त रहिवाशांची पिण्याच्या पाण्याची गरज भागवली जाणार आहे.

या वेळी सावरोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच नागेश मेहतर, ग्रामपंचायत सदस्या नम्रता तटकरे, टाटा स्टीलचे सीएसआर व्यवस्थापक भावेश रावल, डब्ल्युओटीआरच्या मॅनेजर प्रीतीलता गायकवाड, डब्ल्युओटीआरचे अभियंते अमित गुंजाल, डब्ल्युओटीआरचे विनय पगडे आणि निफाणवाडीच्या रहिवासी मंगल पवार उपस्थित होते.

निफाणवाडीच्या रहिवासी मंगल पवार यांनी सांगितले, टाटा स्टीलने पाण्याची टाकी बांधण्यासाठी पावले उचलली याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आमच्या गावातील 22 घरांचे नूतनीकरण कंपनीने करून दिले, त्यानंतर आता आम्ही पाण्याचा अधिक चांगला पुरवठा केला जाण्याच्या प्रतीक्षेत आहोत. या प्रकल्पामुळे आमची ती निकड पूर्ण होईल. महिलांची सामाजिक व आर्थिक स्थिती सुधारावी आणि टाटा स्टीलच्या प्लांटच्या आजूबाजूच्या भागात राहणार्‍या स्थानिक रहिवाशांना पाण्याचा पुरवठा सुरळीतपणे होत राहावा यासाठी डब्ल्यूईई (विमेन एम्पॉवरमेंट अँड एंट्रप्रिन्युअरशिप) आणि डब्ल्यूओटीआर (वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट) यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply