Breaking News

पंतप्रधान मोदींनी घेतला कोरोना स्थितीचा आढावा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. 15) देशभरातील कोरोना परिस्थितीचा उच्चस्तरीय बैठक घेत आढावा घेतला. अनेक राज्यांत व्हेंटिलेटर धूळ खात पडत असल्याच्या बातम्यांची पंतप्रधान मोदींनी गंभीर दखल घेत केंद्राने पुरविलेल्या व्हेंटिलेटरचा वापर आणि सद्यस्थिती याबाबत तातडीने ऑडिट करण्याचे आदेश दिले.
राज्यांनी आकडेवारीचे भय न ठेवता जास्तीत जास्त टेस्ट प्रामाणिकपणे कराव्यात, असे सांगून पंतप्रधान मोदींनी गाव-खेड्यांमध्ये कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीवर चिंता व्यक्त केली. पॉझिटिव्हिटी रेट जास्त असलेल्या भागात टेस्टिंग अजून वाढवण्याची गरज आहे. खेड्यांत डोअर टू डोअर टेस्टिंग आणि सर्व्हिलान्सची व्यवस्था करावी, असेही त्यांनी सूचित केले.
मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात सुमारे 50 लाख चाचण्या घेण्यात येत होत्या. एप्रिलमध्ये ही संख्या वाढून 1.3 कोटी चाचण्या केल्या गेल्या, असे बैठकीत सांगण्यात आले.

Check Also

आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा …

Leave a Reply