नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त
येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान स्वायत्त महाविद्यालयाने, खारघर येथील सरस्वती इंजिनियरिंग महाविद्यालयामध्ये झालेल्या 52व्या आंतरमहाविद्यालयीन रायगड विभागीय सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सलग चौदाव्या वर्षी सर्वाधिक 25 पारितोषिके प्राप्त करून आपल्या देदिप्यमान यशाची परंपरा कायम राखली आहे.
दरवर्षी होणर्या या स्पर्धांमध्ये रायगड जिल्ह्यातील एकूण 22 महाविद्यालये सहभागी झाली होती. या स्पर्धांमध्ये नृत्य, अभिनय, साहित्य, फाईन आर्ट व संगीत या क्षेत्रातील एकूण 32 स्पर्धा घेण्यात आल्या.चांगू काना ठाकूर महाविद्यालयाने सर्वच्या सर्व स्पर्धा प्रकारामध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धार्ंंपैकी 29 स्पर्धांचे निकाल जाहीर करण्यात आले. जाहीर झालेल्या 29 स्पर्धांच्या निकालांपैकी चांगू काना ठाकूर महाविद्यालयाने 09 सांघिक व 16 वैयक्तिक अशी एकूण 25 पारितोषिके पटकाली. या 24 पारितोषिकांपैकी 14 (प्रथम क्रमांक)ाची पारितोषिके, 07 द्वितीय क्रमांकाची आणि 03 तृतीय क्रमांकाची आणि 01 उत्तेजर्नाथ पारितोषिक महाविद्यालयास प्राप्त झाली. महाविद्यालयास प्राप्त झालेली पारितोषिके
सांघिक पारितोषिके – भारतीय समूहगान स्पर्धा (प्रथम क्रमांक) कुमारी गायत्री गुल्जर व संघ; पाश्चात्य समूहगान स्पर्धा (प्रथम क्रमांक) कुमार तन्मय ओक व संघ; वादविवाद स्पर्धा मराठी (प्रथम क्रमांक) कुमारी मिथिला माने व कुमारी मनाली महाडिक; नाटुकलं (हिंदी) स्पर्धा (प्रथम क्रमांक) कुमारी आरती बलिप व संघ; एकांकीका (हिंदी) स्पर्धा (प्रथम क्रमांक) कुमार प्रतिकेश मोरे व संघ; एकांकिका (मराठी) स्पर्धा (द्वितीय क्रमांक) कुमारी श्वेता कुलकर्णी कुमार निखिल गोरे; भारतीय लोकनृत्य स्पर्धा (द्वितीय क्रमांक) कुमारी पल्लवी पाटील व संघ नाटुकलं (मराठी) स्पर्धा (तृतीय क्रमांक) कुमार मनीष भोकाटे व संघ; मूकनाट्य स्पर्धा (उत्तेजर्नाथ) कुमारी मानसी कदम व संघ.
वैयक्तिक पारितोषिके – शास्त्रीय वादन (स्वरवाद्य) स्पर्धा (प्रथम क्रमांक) कुमार अथर्व देव; मराठी कथाकथन स्पर्धा (प्रथम क्रमांक) कुमारी मुग्धा दातार; एकपात्री अभिनय स्पधार्र् हिंदी (प्रथम क्रमांक) कुमारी मुग्धा दातार; रंगोळी स्पर्धा (प्रथम क्रमांक) कुमार रोहित ढोबळे; माती शिल्पकाम स्पर्धा (प्रथम क्रमांक) कुमार नीलेश पवार; चिकटचित्रा स्पर्धा (प्रथम क्रमांक) कुमारी अंकिता गवंडी; भित्तीचित्र स्पर्धा (प्रथम क्रमांक) कुमार ऋषिकेश पवार; कार्टूनिंग स्पर्धा (प्रथम क्रमांक) कुमारी ऋतुजा पाटील; वत्कृत्व अभिनय स्पधार्र् हिंदी (प्रथम क्रमांक) कुमारी मुस्कान मोडक; चित्रकला स्पर्धा (द्वितीय क्रमांक) कुमारी सायुजा पाटील; शास्त्रीय वादन (तालवाद्य) स्पर्धा (द्वितीय क्रमांक) कुमार आदित्य उपाध्ये; मिमिक्री स्पर्धा (द्वितीय क्रमांक) कुमारी श्रावणी वातरकर; पाश्चात्य गायन स्पर्धा (द्वितीय क्रमांक) कुमारी रिया पंडित; मेंहदी (द्वितीय क्रमांक) कुमारी रिया कर्ण; एकपात्री (मराठी) अभिनय स्पर्धा (तृतीय क्रमांक) कुमार उमेश वालके; इंग्रजी कथाकथन स्पर्धा (तृतीय क्रमांक) कुमारी कांदबरी पाटील.
सन 2005 ते 2019 या 13 वर्षामध्ये चांगू काना ठाकूर महाविद्यालयाने या स्पर्धांमध्ये सर्वाधिक पारितोषिके प्राप्त केली होती. या वर्षीही सर्वाधिक पारितोषके प्राप्त करून सांस्कृतिक क्षेत्रात रायगड जिल्ह्यात निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले आहे. सर्व पारितोषिक विजेते विद्यार्थी, महाविद्यालयाचा सांस्कृतिक चमू व सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ. आर. व्ही. येवले व सांस्कृतिक समन्वयक गणेश जगताप यांचे या देदिप्यमान यशाबद्दल माजी खासदार व जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन रामशेठ ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. वसंत बर्हाटे, उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील आणि सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर सेवकवर्ग यांनी विशेष अभिनंदन केले आहे.