Breaking News

भाजपतर्फे मुरूडमध्ये नेत्रतपासणी शिबिर

मुरूड : प्रतिनिधी

शिवजयंती निमित्त तालुका भाजप आणि ज्येष्ठ नेते जनार्दन (आण्णा) कंधारे यांच्या संयुक्त विद्यमाने   मुरूडमध्ये रक्तदाब, मधुमेह आणि नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या दोन दिवसीय शिबिराचे उद्घाटन महिला मोर्चा पाखाडी अध्यक्ष अपर्णा अशोक कारभारी यांच्या हस्ते करण्यात आले. तर जनार्दन कंधारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आरोग्य तपासणीस सुरुवात करण्यात आली.

भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, मुरूड तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, उपाध्यक्ष बाळा भगत, महेश मानकर, सरचिटणीस नरेश वारगे, पाखाडी अध्यक्ष सुधीर पाटील, अल्पसंख्यक महिला अध्यक्ष नसीम हनीफ उलडे, प्रवीण बैकर, अभिजित पानवलकर, माजी तहसीलदार नयन कर्णिक, प्रवीण भायदे, परेश किल्लेकर, सुनील खेऊर, किशोर म्हसळकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

या दोन दिवशीय शिबिरातील सर्व सेवा मोफत मिळणार असून नागरिकांनी याचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आण्णा कंधारे यांनी केले. शिबिराच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

Check Also

झालमुरी, एसडी, आरडी आणि सुरांची अवीट मैफल!

‌‘पुरवैय्या‌’ने पनवेलकरांना दिली अविस्मरणीय सांगीतिक पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्तपश्चिम बंगालने हिंदी चित्रपटसृष्टीला अनिल विश्वास, …

Leave a Reply