Breaking News

माणगावमधील शिबिरात 151 जणांचे रक्तदान

माणगाव : प्रतिनिधी

शिवजयंती निमित्त माणगाव तालुक्यातील विविध संस्था व मंडळांनी शनिवारी (दि.19) शहरातील सरलादेवी मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या शिबिरात 151 जणांनी रक्तदान केले.

माणगाव तालुका पत्रकार संघ, उपजिल्हा रुग्णालय, रोटरी क्लब, देवा ग्रुप फाउंडेशन, छावा प्रतिष्ठान,नवरात्र मित्रमंडळ, एस. एस. निकम इंग्लिश स्कुल, माणगाव जनरल नर्सिंग कॉलेज, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, अविष्कार फाउंडेशन, व्यापारी असोसिएशन, टिकमभाई मेथा कॉमर्स कॉलेज, साई बोअरवेल, मस्जिद मोहल्ला, शिवम कॉम्प्यूटर सेंटर, युवा क्रिकेट क्लब, एकता ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन, श्री. शिवछत्रपती ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन तसेच नवयुवक मित्र मंडळ-खांदाड, नमस्कार मित्र मंडळ-बोंडशेत, पालवी मित्र मंडळ-इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने व केईएम रुग्णालय मुंबई यांच्या सहकार्याने शनिवारी सरलादेवी मंगल कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. रिक्षा संघटनेचे अध्यक्ष संजयआण्णा साबळे, डॉ. संतोष कामेरकर, अ‍ॅड. प्रकाश ओक, केईएम रुग्णालयाचे समाजविकास अधिकारी डॉ. हेमंत सकट आदींनी मार्गदर्शन केले. प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर, भाजपचे अध्यक्ष तालुका संजयआप्पा ढवळे, डॉ. महेश प्रजापती, डॉ. मदन निकम, मनोहर मेहता, नगरसेवक राजेश मेहता, दिनेश रातवडकर, सामाजिक कार्यकर्ते घनश्याम शेट, माजी उपसरपंच नितीन दसवते आदी मान्यवरांसह रक्तदाते उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्वच संस्था संघटनांचे पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply