Breaking News

शिवजयंतीनिमित्त स्वच्छता अभियान

सिद्धेश्वर ग्रामपंचायत हद्दीतील गावे, वाड्या झाल्या प्लास्टिकमुक्त

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर ग्रामपंचायतीने  शिवजयंती निमित्त स्वच्छता अभियान राबवून ग्रामपंचायत हद्दीतील सर्व गावे व वाड्या प्लास्टिक मुक्त केल्या. या वेळी संकलीत केलेले प्लास्टिक पुननिर्माण प्रक्रिया (रिसायकल) करण्यासाठी पाठविण्यात आले.

सरपंच उमेश यादव यांनी सांगितले की, सिद्धेश्वर ग्रामपंचायत हद्दीतील वावळोली, सिद्धेश्वर, पुई, खांडसई व कासारवाडी ही गावे व येथील वाड्यांमध्ये सुकन्या ग्रामसंघ बचतगट, शिक्षक व विद्यार्थी, ग्रामपंचायत पथक, स्वदेस आणि प्राइड इंडिया गाव समित्या यांच्यासह ग्रामस्थांनी शनिवारी स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत प्रामुख्याने गावात पडलेल्या प्लास्टिक बाटल्या, पिशव्या व विविध प्लास्टिक वेस्टन गोळा करण्यात आले. आणि ग्रामपंचायत संकलन केंद्रात जमा केले गेले. या वेळी तहसीलदार दिलीप रायण्णावार यांनी येथे भेट दिली.

प्लास्टिक संकलन केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देणारे नंदकुमार सूरावकर, तसेच या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन कमी खर्चात ग्रामपंचायतीला पिशव्या उपलब्ध करून देणारे सतीश कदम आणि त्यांचे सहकारी विलास मुंढे, सुकन्या ग्रामसंघाच्या अध्यक्षा प्राची यादव, अमित तांबडे यांचा तहसीलदार दिलीप रायण्णावार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

सरपंच उमेश यादव, उपसरपंच योगेश सुरावकर, ग्रामपंचायत सदस्य नथुराम चोरघे, ग्रामसेवक ए. टी. गोरड, पोलिस पाटील सुनील पोंगडे, प्राइड इंडिया प्रतिनिधी रोषणा महाले उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply