Breaking News

रोह्यात मत्स्य संवर्धन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम

रोहे ः प्रतिनिधी

शेतकर्‍यांनी शेती बरोबर शेतीपुरक व्यवसाय आत्मसात करावेत, असे आवाहन किल्ला रोहा येथील कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. मनोज तलाठी यांनी केले.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या किल्ला रोहा येथील कृषी विज्ञान केंद्रांच्या वतीने पुई कॉलनी येथे नाविन्यपुर्ण मत्ससंवर्धन तंत्रज्ञान या विषयावर प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. 29 व 30 एप्रिल रोजी झालेल्या या प्रशिक्षण वर्गात डॉ. मनोज तलाठी उपस्थित शेतकर्‍यांना मार्गदर्शन करीत होते. शिरगाव (जि. रत्नागिरी) मत्स्य महाविद्यालयाचे डॉ. एस. डी. नाईक, तांत्रीक मार्गदर्शक  डॉ. बी. आर. चव्हाण, डॉ. एस. जे. मेश्राम, डॉ. आर. एम. तीबीले, प्रा. माधव गित्ते, प्रगतशील शेतकरी हसन म्हसलई आणि श्री राजन झेमसे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रा. माधव गित्ते यांनी प्रास्ताविकात प्रशिक्षण वर्गाचे महत्व विषद केले. डॉ. एस. डी. नाईक यांनी गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धनाची सद्य स्थिती आणि भवितव्य व नाविन्यपुर्ण मत्स्य संवर्धन तंत्रज्ञान या विषयाचा आढावा घेतला.

कार्यक्रमाच्या तांत्रिक सत्रामध्ये शास्त्रज्ञांकडुन बायोफ्लॉक तंत्रज्ञान, रिसर्क्युलेटरी अ‍ॅक्वाकल्चर सिस्टिम तंत्रज्ञान, अ‍ॅक्वापोनीक्स तंत्रज्ञान, माशांचे रोग व निदान, वाढ खुंटलेल्या बोटुकलीचे उत्पादन तंत्रज्ञान, एकलिंगीय तिलापिया माशांचे संवर्धन तंत्रज्ञान, मत्स्य संवर्धनात खाद्य व पाणी व्यवस्थापनाचे महत्व या विषयाचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी प्रगतशील शेतकरी हसन म्हसलई यांच्या प्रक्षेत्रास भेट देवुन प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले.

प्रशिक्षण वर्गाच्या उत्तरार्धात मत्स्य शेतकरी व युवकांच्या मत्स्य संवर्धन या विषयावरील प्रश्नांना सर्व शास्त्रज्ञांनी उत्तरे देऊन  येाग्य मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण वर्गात पुई पंचक्रोशीतील बहुसंख्य मत्स्य शेतकरी आणि युवक व युवती सहभागी झाले होते. श्री मोरे यांनी आभार मानले. दोन दिवशीय प्रशिक्षण वर्ग यशस्वी करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी व कर्मचारी, पुई ग्रामस्थ व मत्स्य शेतकर्‍यांनी परिश्रम घेतले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply