Breaking News

पोशिर गावात दोन गटांत हाणामारी; तीन जखमी

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील पोशिर ग्रामपंचायतीमधील रस्त्याचे काम सुरू होते, त्या कामात जेसीबी मशीन लावून रस्ता फोडला जात असताना रस्ता का फोडला? असा प्रश्न केल्याने तेथे दोन गटात हाणामारी झाली. त्यात लोखंडी सळईने झालेल्या मारहाणीत तीन जण जखमी झाले असून, दहा जणांवर दोन वेगवेगळ्या एफआयआर नुसार गुन्हा दाखल झाला आहे. नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पोशिर ग्रामपंचायतीकडून गावातील एका रस्त्याचे काम केले जात होते.त्यावेळी पांडुरंग कृष्णा राणे यांच्या भावाने जेसीबी लावून रस्ता का फोडता? असा प्रश्न केला. त्यानंतर तेथे काम करीत असलेल्या राजाराम बाबू शिणारे, महेश राजाराम शिणारे, चरण राजाराम शिणारे, गुरू राजाराम शिणारे तेजस चंद्रकांत राणे आणि संदीप गोविंद राणे यांनी पांडुरंग कृष्णा राणे यांच्या डाव्या डोळ्याला मारहाण केली तसेच गुडघ्याला लोखंडी सळईने मारहाण करून जखमी केले. ही माहिती मिळताच केशव कृष्णा राणे, पांडुरंग कृष्णा राणे, किरण केशव राणे आणि निर्गुण पांडुरंग राणे यांनी राजाराम गणपत शिणारे, चरण राजाराम शिणारे यांना मारहाण केली. याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, दोन्ही गटातील एकूण दहा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक तात्या सावजी करीत आहेत.

Check Also

पनवेलच्या ग्रामीण भागात सभापती, उपसभापतींचा अधिकाऱ्यांसमवेत दौरा

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता जाऊन प्रथमच भारतीय जनता पक्षाचा …

Leave a Reply