उरण : वार्ताहर
महाराष्ट्राचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उरण नगर परिषदेच्या वतीने विमला तलावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आमदार महेश बालदी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नगरसेवक, नगरसेविका यांनीही अभिवादन केले. विमला तलाव येथील गार्डनमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
या वेळी भाजप तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, नगराध्यक्ष सायली म्हात्रे, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, मुख्याधिकारी संतोष माळी, नगरसेवक राजेश ठाकूर, नगरसेविका यास्मिन गॅस, दमयंती म्हात्रे, स्नेहल कासारे, संतोष पवार, अधिकारी सुरेश पोसतांडेल, भाजप शहर महिला अध्यक्ष संपूर्णा थळी नगर परिषद कर्मचारी आदी उपस्थित होते.