Breaking News

अस्मितेच्या लढाईसाठी आझाद मैदानात उपस्थित राहा

 सकल मराठा समाज राज्य समन्वयक विनोद साबळे यांचे आवाहन

खोपोली, मोहोपाडा : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून छत्रपती संभाजी राजे पुन्हा आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणासाठी संभाजी राजे येत्या शनिवारपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार आहेत. मराठा समाजाची ही अस्मितेची लढाई असून त्यात सहभागी होण्यासाठी रायगड जिल्ह्यातील समाज बांधवांनी  हजारोंच्या संख्येने आझाद मैदानात उपस्थित रहावे, असे आवाहन राज्य समन्वयक विनोद साबळे यांनी मंगळवारी (दि. 22) दांडफाटा येथे केले.

सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली लाखोंच्या संख्येने मोर्चे निघाले तरीदेखील सरकारने आरक्षण दिले नाही. त्यामुळे शासनाला जाग यावी, यासाठी छत्रपती संभाजी राजे येत्या शनिवार (दि. 26) पासून आमरण उपोषण सुरू करणार आहेत. या आंदोलनात रायगड जिल्ह्यातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, यासाठी जिल्ह्यात गाव बैठका सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी दांडफाटा येथे बैठक घेण्यात आली. त्यावेळी साबळे उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते.

सकल मराठा समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी हभप कृष्णा महाराज लांबे व हभप मांडे महाराज यांनी वारकरी संप्रदाया तर्फे छत्रपती संभाजी राजे यांच्या आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला असून जिल्ह्यातील स्थानिक संस्थांनी दांडफाटा येथील बैठकीत  विनोद साबळे यांच्याकडे पाठिंबा पत्रे सुपूर्द केली आहेत.

सरपंच पल्लवी विकास देवघरे, हभप कृष्णा महाराज लांबे, हभप मांडे महाराज, हभप मारुती महाराज पाटील, तसेच सुनिल पाटील, गणेश कडू, राजेश लाड, अमोल जाधव, अमित यादव, किशोर देवघरे, अशोक महाडिक, मनोज पवार, महादेव कचरे, प्रकाश पालकर, अतिष साबळे, दिपक जगताप यांच्यासह मराठा समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply