Breaking News

डॉ. किरण पाटील यांची नागोठण्याला भेट

नागोठणे : प्रतिनिधी – राज्य पातळीवरील जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या येथील ग्रामपंचायतीच्या ज्या कोणत्या योजना प्रलंबित आहेत त्याची ग्रामपंचायतीने माहिती द्यावी. माहिती उपलब्ध झाल्यावर त्या प्रश्नांसंदर्भात लवकरच अलिबाग येथे बैठक घेण्यात येईल, असे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषदेचा कारभार हाती घेतल्यानंतर डॉ. किरण पाटील यांनी नागोठणे ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन माहिती जाणून घेतली, त्या वेळी घेण्यात आलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन, सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, उपसरपंच सुरेश जैन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंडलिक, रोहे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभय ससाणे, बारदसकर, गोरखनाथ वायल, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर साळुंके, ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर यांच्यासह रोहे पंचायत समितीचा अधिकारीवर्ग उपस्थित होता.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply