Breaking News

थळ येथील आरसीएफ कंपनीत स्फोट

एक गंभीर जखमी तर दुसर्‍याला मानसिक धक्का

अलिबाग : प्रतिनिधी

तालुक्यातील थळ येथील राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स (आरसीएफ) कंपनीच्या हेवी वॉटर प्लांटमध्ये बुधवारी (दि. 23)सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला. त्यात एक कर्मचारी गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले आहे. तर एका कर्मचार्‍याला मानसिक धक्का बसला आहे.

विजय माळी असे या अपघातात जखमी झालेल्या कर्मचार्‍याचे नाव असून, अमाईड केमिकल उडून यांचा संपूर्ण चेहरा भाजला आहे. प्राथमिक उपचारानंतर त्यांना अधिक उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या स्फोटामुळे सिद्धेश भगत हा कर्मचारी प्रचंड घाबरल्याने त्याला जबर मानसिक धक्का बसला आहे.

आरसीएफ कंपनीच्या जनसंपर्क अधिकार्‍यांना संपर्क साधला असता तांत्रीक अडचणीमुळे त्यांच्याशी बोलता आले नाही. दरम्यान, व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे असे अपघात होत असल्याने कामगार वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Check Also

श्याम बेनेगल; आशय अन् पोस्टर्सचे वैशिष्ट्य जपणारे दिग्दर्शक

अंकूर असो की निशांत वा मंडी… चित्रपटाचे नाव घेताच त्या चित्रपटाचे दिग्दर्शक श्याम बेनेगल आहेत …

Leave a Reply