Breaking News

शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत आदर्श उपविधीस मान्यता

पनवेल : प्रतिनिधी

दिनदयाळ अंत्योदय योजना -राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियानांर्तत ‘फेरीवाल्यांना सहाय्य’ या घटकामध्ये फेरीवाला धोरणांतर्गत आदर्श उपविधीस पनवेल महानगरपालिकेच्या  शहर फेरीवाला समितीच्या सभेत गुरुवारी  (24 फेब्रुवारी) मान्यता देण्याताली.

पनवेल महानगरपालिकेची शहर फेरीवाला समितीची सभा गुरुवार (24 फेबु्रवारी) आयुक्त गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यालयात घेण्यात आली. या बैठकीला  शहर फेरीवाला समितीचे सर्व सदस्य , उपायुक्त कैलास गावडे, दिनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाचे व्यवस्थापक विनया म्हात्रे, नवनाथ थोरात उपस्थित होते.

फेरीवाला सहाय्य् अभियानांतर्गत शहरातील फेरीवाल्याच्या विविध गरजा व समस्या सोडविण्यासाठी महापालिका पुढाकार घेत आहे. या अंतर्गत फेरीवाला समितीची स्थापना करण्यात आली आहे. आज फेरीवाला धोरण अंतर्गत महापालिका हद्दीतील पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण व नोंदणी करणे, विक्री प्रमाणपत्र व ओळखपत्र तयार करणे, विक्री शुल्क व आकारणी  करणे, फेरीवाल्यांसाठी बाजारपेठांचा विकास करणे, स्थिर फेरीवाल्यांसाठी जागेची निश्चिती करणे त्याचप्रमाणे फिरते फेरीवाले झोन, नो फेरीवाले झोन निश्चिती करणे , या उपविधी विषयीचे प्रेझेंटेशन देण्यात आले. या आदर्श उपविधीस समितीने सर्वानुमते मान्यता दिली.

फेरीवाल्यांना सहाय्य अभियानांतर्गत महापालिकेच्यावतीने फेरीवाल्यांचा बाजाराच्या गरजेच्या आधारावर कौशल्यांचा विकास करून त्यांच्या उपजिविकेचा दर्जा उंचावण्यावरती भर देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने शहरी फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करणे, त्यांना ओळखपत्र देणे, शहर फेरीवाला आराखडा विकसित करणे, फेरीवाला क्षेत्रासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास करणे, त्यांना कौशल्य् विकास प्रशिक्षण देऊन त्यांचा आर्थिक विकास करणे ही उदिष्ट्ये ठेवण्यात आली आहेत.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply