पनेवल : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालय इमारतीचे बांधकाम करण्यास च्या स्थायी समिती बैठकित मंजूरी देण्यात आली. महानगरपालिकेची स्थायी समितीची ऑनलाइन सभा शुक्रवारी (दि. 25) मुख्यालयातील आयुक्त दालनासमोरील सभागृहात स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील निर्माण होणार्या घनकचर्याची बाह्य यंत्रणेद्वारे सशुल्क कचरा उचलुन विल्हेवाट लावण्याबाबतचा विषय आजच्या बैठकित मंजूर करण्यात आला. महापालिका क्षेत्रात सार्वजनिक शौचालय, स्वच्छता गृहांची अत्याधुनिक तंत्राचा वापर करून निर्जंतुकीकरण करण्याच्या विषयास स्थायी समितीने मंजूरी दिली. पनवेल व्यवसाय, हॉटेल परवाने नवीन कारखाने उद्योगधंदे सर्वेक्षण, नोंदणीकरण नुतनीकरण, दुकानावरील जाहिरती व परवाना संबधीच्या अनुषंगिक काम स्वारस्य अभिव्यक्ती पध्दतीने करण्याचा विषय स्थायी समितीने मंजूरी दिली.
पनवेल महापालिका क्षेत्रात एस. टी.स्टॅडजवळ अमृत योजनेंतर्गत मायक्रोन टनेंलिगद्वारे 1000 मिमी व्यासाची केसींग पाईप्स व 400 मिमी व्यासाची कॅरींग पाईप टाकण्याच्या विषयास मंजूरी देण्यात आली. पनवेल महानगरपालिकेकरिता स्वच्छ भारत मिशन (नागरी) अंतर्गत प्रोजेक्ट इप्लि्ममिंटेशन युनिट तयार करण्याच्या विषयास स्थायी समितीने मंजूरी दिली.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आपत्कालीन परिस्थितीत व नियमित वार्षिक नाले साफसफाई करणेकामी प्राप्त झालेल्या न्यूनतम दरास मान्यता मिळण्याच्या विषयास स्थायी समितीने मंजूरी दिली.
Check Also
सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …