पनवेल : रामप्रहर वृत्त : स्थानिक कलाकारांसाठी पर्वणी असलेल्या ‘रंगनिल संध्या’ हा कलाविष्काराचा सोहळा शनिवारी (दि. 9) पनवेलमध्ये मोठ्या उत्साहात रंगला. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व रंगनिल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाने पनवेलकर मंत्रमुग्ध झाले. सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन वर्षा प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रंगनिलच्या अध्यक्षा कल्पना कोठारी, ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी, उद्योजक विलास कोठारी, अनिल कुरघोडे, रमेश भोळे, स्वरुपचंद कोठारी, संजीवनी बेलापूरकर आदी उपस्थित होते. रंगनिल संध्या कार्यक्रमाची निर्मिती रंगनिलच्या अध्यक्षा कल्पना कोठारी यांची, तर कार्यक्रमाची संकल्पना तृप्ती मानकामे यांची होती. संगीत संयोजक म्हणून विजय मनोहर यांनी भूमिका बजावली. या कार्यक्रमात तृप्ती मानकामे, डॉ. अभिषेक मंडलिक, संविधा पाटकर, मकरंद बाळ, संजय गोडसे, निखिल मनोहर, प्रतीक जेउरगी, नीलांबरी अनगळ, वर्षा जोशी, सायली लाड, रेणुका दलाल, ओजस्विता करंदीकर, देवयानी कोठारी यांनी हिंदी-मराठी गाणी सादर करून उपस्थित रसिकांची मने जिंकली.
Check Also
आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत
पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा …