कर्जत : बातमीदार
आदित्य दृष्टी सामाजिक विकास प्रतिष्ठित मार्फत कर्जत तालुक्यातील नसरापूर ग्रामपंचायत कार्यालयात बचतगट सक्षम आणि स्वावलंबी होण्यासाठी महिलांना मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.
शिबिरात प्रशिक्षक सुवर्णा चव्हाण यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
सरपंच प्रमिला मोहिते, उपसरपंच दीपा कोळंबे, योगिता कोळंबे, कविता हिलम, ज्ञानगंगा ग्रामसंघाच्या हर्षदा थोरवे, सारिका कोळंबे, सविता तिखंडे, नम्रता म्हात्रे, मनिषा देशमुख, जगदीश दगडे, प्रज्ञा वाघमारे, वृषाली शिंदे, रोशनी कोळंबे, ग्रामपंचायत कर्मचारी मोतीराम कोळंबे, शरद तिखंडे यांच्यासह नसरापूर ग्रामपंचायत विभागतील महिला बचतगटाच्या सदस्या या शिबिरात सहभागी झाल्या होत्या.