7 ते 12 सप्टेंबरदरम्यान पनवेल-चिपळूण डेमू विशेष रेल्वेगाड्या धावणार
रोहे : प्रतिनिधी
गणेशोत्सवात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पनवेल ते चिपळूण दरम्यान डेमू विशेष सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गणेश भक्तांचा परतीचा प्रवास सुखकारक होणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागच्या वतीने देण्यात आली. मध्य रेल्वेच्या वतीने पनवेल ते चिपळूण दरम्यान चालविण्यात येणार्या डेमू विशेष सेवामध्ये 01597 ऊएचण पनवेल येथून 7 ते 12 सप्टेबरपर्यंत दररोज 19.15 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 23.50 वाजता चिपळूण येथे पोहोचेल. तर 01598 ऊएचण चिपळूण येथून 7 ते 12 सप्टेबरपर्यंत दररोज 13.45 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी पनवेल येथे 18.30 वाजता पोहोचेल. आठ डब्ब्यांच्या या गाडीला रोहा, माणगाव, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, खेड हे थांबे आहेत. या विशेष डेमू गाड्या अनारक्षित एक्स्प्रेस भाड्यानुसार चालविण्यात येतील. प्रवासी यूटीएस प्रणालीद्वारे तिकीट बुक करू शकतात.