Breaking News

आजपासून भिवंडीत घुमणार कबड्डीचा दम; 69व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचा थरार

भिवंडी ः प्रतिनिधी

ठाणे विरुद्ध परभणी, रत्नागिरी विरुद्ध पालघर या पुरुष, तर ठाणे विरुद्ध सिंधुदुर्ग, पुणे विरुद्ध सांगली या महिला गटातील लढतींनी 69व्या वरिष्ठ गट पुरुष आणि महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेचे बिगूल वाजणार आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली हिंदवी युवा प्रतिष्ठान व वेताळ क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त सहकार्याने सोमवार (दि. 28)पासून भिवंडीच्या बंदर्‍या मारुती क्रीडानगरीत चार दिवस ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेतूनच महाराष्ट्राचा पुरुष व महिला गटाचा संघ निवडण्यात येणार असून तो 69व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल. नुकतीच प्रो-कबड्डी स्पर्धा आटोपल्याने त्या स्पर्धेत खेळलेले खेळाडू या स्पर्धेत खेळण्याची शक्यता आहे. या स्पर्धेकरिता मातीची सहा उत्तम अशी क्रीडांगणे तयार करण्यात आली असून कबड्डी दर्शकांना सामन्याचा आनंद लुटता यावा म्हणून पाच हजार क्षमतेची प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली आहे. सामने सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात प्रखर विद्युत झोतात खेळविण्यात येतील. या  स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी सायंकाळी 5.30 वा. केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष खासदार गजानन कीर्तिकर आणि आयोजक श्रीधर पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply