Breaking News

कोशिश फाउंडेशनतर्फे श्री गणेश उत्सव वेशभूषा स्पर्धा

परेश ठाकूर यांच्याकडून विजेत्यांचा गौरव

पनवेल ः रामप्रहर वृत्त
गणेश चतुर्थीचे औचित्य साधून कोशिश फाउंडेशनच्या वतीने रविवारी (दि. 24) श्री गणेश उत्सव वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या वेळी कोशिश फाउंडेशनचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत स्पर्धकांचे कौतुक केले व विजेत्यांना गौरविले.
या स्पर्धेचे आयोजन पनवेल शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटीमधील गणेश मंदिर येथे रविवारी (दि. 24) करण्यात आले होते. स्पर्धा 15 वर्षाखालील मुला-मुलींसाठी तीन गटांत घेण्यात आली.
स्पर्धेवेळी भाजप जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, युवा नेते चिन्मय समेळ, सोसायटी मित्र मंडळाचे अध्यक्ष सुमित झुंजारराव, उल्हास झुंजारराव, संदीप पाटील, आयुफ अकुला, आदित्य देशमुख, गौरव चव्हाण, अमय देशमुख, सुरज गुप्ता यांच्यासह पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
या वेळी विविध वयोगटांमध्ये श्रेय सिद्धार्थ पोटे, अध्यांश भागवत, स्वरदा गोखले, राघव भट्ट, रियांशू भानूशाली यांनी प्रथम; ओम बहिरा, तनया गोविलकर, पौर्णिमा मुंबईकर, शार्विल शेट्ये, दिविशा ठक्कर यांनी द्वितीय; तर अवंतिका धात्रक, पूजा नथानी, रूतवा गजरे, काश्वी पटेल आणि अन्वी धात्रक यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. विजेत्यांना परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नूतन पाटील यांनी केले.

Check Also

शेकापचा माजी नगरसेवक सुनील बहिराच्या पोलीस कोठडीत वाढ

पनवेल : रामप्रहर वृत्त प्रॉपर्टीसाठी मयत वडिलांचे खोटे शपथपत्र बनवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पनवेल तक्का …

Leave a Reply