Breaking News

सिडको हद्दीतील पहिलीच बी 10 सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन

पनवेल : प्रतिनिधी

नवीन पनवेल सिडको वसाहतीतील ओनर्स असोशीएशनचे गृह निर्माण संस्थेत रूपांतरण होण्याचा मान बी-10 ओनर्स असोसिएशनला मिळाला असून त्याचे नामकरण रविवारी (दि. 27) भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील घरत यांचे हस्ते करण्यात आले. पनवेल महानगरपालिकेमधील सिडको हद्दीतील पहिलीच अशी गृहनिर्माण संस्था आहे यानंतर लवकरात लवकर पुनर्विकास करण्यात येणार आहे.

नवीन पनवेल (पूर्व) मध्ये सिडको वसाहत आहे. या ठिकाणी असलेल्या वसाहतीत सिडकोने सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्यादित) स्थापन न करता अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन स्थापन केल्या आहेत. त्यामुळे त्यांना सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अधिकार मिळत नाहीत. सिडकोने  बी-10 अपार्टमेंटचे 1980 साली बांधकाम करून 1983 साली लोकांना हस्तांतरण करून रजिस्ट्रेशन केले. सध्या सिडकोने बांधलेल्या सर्व इमारती जीर्ण झालेल्या आहेत. इमारतींचे स्लॅप पडणे, कॉलमला तडे जाणे. अशा तक्रारी येत होत्या म्हणून सर्व रहिवाशांनी एकत्र येऊन या गृहनिर्माण संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला असोशिएशनचे अध्यक्ष अनिल घरत व सर्व कमिटी सदस्यांनी पूर्ण वेळ देऊन कामकाज पूर्ण केले.

या संस्थेचे नवीन नामकरण बी 10 सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्यादित) असे होऊन 25 फेब्रुवारीपासून कार्यरत झाली आहे. नामकरण कार्यक्रमाचे उद्घाटन सुनील घरत, माजी नगराध्यक्ष व अनिल घरत अध्यक्ष, सचिव अजित म्हात्रे बी-10 अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन यांनी केले. या कार्यक्रमास सर्व पदाधिकारी इमारत प्रतिनिधी पुनर्विकास कमिटी व सर्व घरमालक उपस्थित होते.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply