उरण : वार्ताहर
जनतेच्या अडी-अडचणी सोडविण्यात कार्यतत्पर असणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली समाजहिताचे कार्य आम्ही जनतेचे सेवक म्हणून हाती घेतले आहे. त्याच भावनेने उरण मतदारसंघात मागील वर्षी 500 कोटींची कामे मार्गी लावली आहेत. आज केंद्रात मोदी सरकार आहे, तर राज्यात पुन्हा भाजप सत्तेवर येणार आहे. या सत्तेच्या माध्यमातून मतदारसंघात तीन हजार कोटींची मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेऊ, असा विश्वास आमदार महेश बालदी यांनी शुक्रवारी (दि. 9) येथे व्यक्त केला.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार कोरोना महामारीच्या काळात सेवावृतीने भाजपच्या उरणमधील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जे मदतकार्य केले त्याच्या ई-पुस्तिकेचे प्रकाशन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
उरण येथील तेरापंथी हॉलमध्ये झालेल्या या प्रकाशन समारंभास भाजपचे उरण तालुका अध्यक्ष व नगरसेवक रवी भोईर, शहर अध्यक्ष व नगरसेवक कौशिक शाह, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, रायगड जिल्हा ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत घरत, वाहतूक संघटना जिल्हा अध्यक्ष सुधीर घरत, कामगार सेल जिल्हा अध्यक्ष जितेंद्र घरत, अल्पसंख्याक सेल जिल्हा अध्यक्ष जसीन गॅस, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शेखर पाटील, शहर अध्यक्ष निलेश पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष नीळकंठ घरत, तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, पंडित घरत, मुकुंद गावंड, सरचिटणीस सुनील पाटील, दीपक भोईर, नगरसेवक राजेश ठाकूर, महालण विभागीय अध्यक्ष महेश कडू, मेघनाथ म्हात्रे, तालुका वाहतूक अध्यक्ष विकी पाटील, नवीन शेवा सरपंच निशांत घरत, माजी सरपंच गौरव कोळी, प्रमोद म्हात्रे, मिलिंद पाटील, प्रसाद पाटील, गणेश घरत, सागर मोहिते, रोहित पाटील, नितीन पाटील, हितेन शाह, रोहित पाटील, मदन कोळी, निलेश घरत, प्रशांत दर्णे, मनोहर सहतीया, ब्लेस कोळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतरही विरोधकांना उरणमध्ये जनहितार्थ कामे मार्गी लावता येत नसल्याने भाजपच्या आमदाराने काय केले असे विचारत मच्छी मार्केटचा मुद्दा उपस्थित करून डंका वाजविण्याचा प्रयत्न करीत असतील, तर त्याच विरोधकांचे दात तालुक्यातील मासे विक्री करणार्या कोळी महिला एक दिवस घशात घातल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत, असे आमदार महेश बालदी या वेळी म्हणाले.
Check Also
आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत
पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा …