Breaking News

ओबीसी नेते जे. डी. तांडेल यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त

ओबीसी जनमोर्चाचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ अर्थतज्ञ जे. डी. तांडेल यांचा 57वा वाढदिवस सोमवारी (दि. 28) विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. सकाळी तळोजा एमआयडीसी येथील परमशांतीधाम वृध्दाश्रमातील वृद्धांना फळांचे वाटप करण्यात आले.

या वेळी ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाशअण्णा शेंडगे, कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर, उपाध्यक्ष दशरथ पाटील, ओबीसी नेते अरुण खरमाटे, सरचिटणीस अरविंद डाफळे, चिटणीस व ज्येष्ठ पत्रकार दीपक म्हात्रे, अखिल आगरी समाज परिषदेचे सहचिटणीस डी. बी. पाटील, श्याम मोकल व जे. डी. तांडेल यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

या कार्यक्रमात प्रकाशअण्णा शेंडगे यांनी जे. डी. तांडेल यांच्या कार्याचे कौतुक केले. ओबीसी जनमोर्चाचे जे. डी. तांडेल हे एक प्रमुख आधारस्तंभ आहेत, असे ते म्हणाले. या वेळी दशरथ पाटील, अरुण खरमाटे, चंद्रकांत बावकर, अरविंद डाफळे, दीपक म्हात्रे यांनी आपल्या भाषणात जे. डी. तांडेल यांनी महाराष्ट्रातील ओबीसी समाजासाठी यापुढेही कार्य करावे, अशा शुभेच्छा दिल्या. मेघा तांडेल यांनी उपस्थितांचे आभार मानले. या वेळी परमशांतीधाम वृद्धाश्रमास जे. डी. तांडेल यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त 25 हजार रुपयांची देणगी दिली. त्यांचे अभय वाघ यांनी आभार मानले.

दुपारी आगरी शिक्षण संस्थेच्या पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना हायजेनिक किट्स वाटप करण्यात आले. या वेळी झालेल्या कार्यक्रमास शाळा चेअरमन श्रुती म्हात्रे, प्राचार्य पंकज भगत, यशवंत घरत, जगन्नाथ तांडेल, दीपक म्हात्रे, डी. बी. पाटील, श्याम मोकल तसेच शिक्षकवर्ग उपस्थित होता. या वेळी तांडेल यांच्या हायजेनिक किट्स वाटपाचा उपस्थितांनी गौरव केला. जे. डी. तांडेल यांनी शाळेतील इयत्ता सातवीच्या वर्गात प्रथम येणार्‍यास खास पारितोषिक देण्यासाठी 25 हजार रुपयांचा चेक प्राचार्य पंकज भगत यांच्याकडे सुपूर्द केला. या पैशाच्या व्याजातून येणारी रक्कम प्रथम येणार्‍या विद्यार्थ्यांस द्यावी, अशी सूचना त्यांनी प्राचार्यांना केली. अशा प्रकारे जे. डी. तांडेल यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी भावनेने साजरा करण्यात आला.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply