Breaking News

खारघरमध्ये महिला कावड यात्रा उत्साहात

खारघर : रामप्रहर वृत्त

देशातील प्रथमच भव्य महिला कावड यात्रा खारघरमध्ये रविवारी (दि. 27) निघाली. विश्व मांगल्य सभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा रेखाताई खंडेलवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कावड यात्रा खारघरमधील उत्सव चौक ते सेक्टर 12 मधील शंकराच्या मंदिरापर्यंत्त आयोजित करण्यात आली होती. या यात्रेला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत यात्रेचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले.

या वेळी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, स्थायी समिती सभापती अ‍ॅड. नरेश ठाकूर, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, महिला व बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, प्रभाग समिती ‘अ’च्या सभापती संजना कदम, प्रभाग समिती ‘ब’च्या सभापती प्रमिला पाटील, नगरसेवक शत्रृघ्न काकडे, रामजी बेरा, प्रवीण पाटील, निलेश बावीस्कर, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, नेत्रा पाटील, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नलीनी हावरे, सुरेश हावरे, उज्वला कांबळे, दिपाली देशमुख, युवा नेते समीर कदम, विनोद घरत, गुरुनाथ गायकर, अमर उपाध्याय, महिला मोर्चाच्या लीना पाटील, बिना गोगरी, वर्षा प्रशांत ठाकूर, भाजप पनवेल शहर महिला मोर्चा अध्यक्ष वर्षा नाईक आदी उपस्थित होते.

Check Also

नमो चषकात कबड्डीचा थरार!

पुरुष गटात नवकिरण, तर महिला गटात कर्नाळा स्पोर्ट्स विजयी उलवे नोड : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ …

Leave a Reply