कर्जत : बातमीदार
रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेतील कुस्तीमध्ये कर्जत तालुक्यातील मल्लांनी मोठी कामगिरी केली आहे. कुस्तीमधील चारही गटात कर्जतचे मल्ल अव्वल ठरले.
कर्जतच्या सावळे येथील मल्लांनी तालुक्यात बाजी मारून जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला होता. जिल्हास्तरावरदेखील त्यांनी आपला दबदबा कायम ठेवला. 48 किलो वजनी गटात सुधीर दामू रसाळ, 55 किलो वजनी गटात युवराज निरंजन उमरसिंग, 61 किलो वजनी गटात किरण बाळकृष्ण धुळे आणि 71 किलो वजनी गटात मानव नरेश धुळे यांनी बाजी मारली. त्यांना तालुका कुस्तीगीर तालीम संघाचे अध्यक्ष भगवान धुळे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल सर्वांचे कौतुक होत आहे.