Breaking News

ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे निधन

मुंबई ः प्रतिनिधी

ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे गुरुवारी (दि. 15) अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 72 वर्षांच्या होत्या. हृदय व फुप्फुसाच्या विकाराने त्रस्त असलेल्या सिन्हा यांच्यावर जुहू येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ’छोटी सी बात’, ’रजनीगंधा’, ’पती, पत्नी और वो’, ’तुम्हारे लिए’, ’सफेद झूठ’, ’मुक्ती’ ’सबूत’ अशा गाजलेल्या चित्रपटांत झळकलेल्या विद्या सिन्हा यांची मनोरंजनसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख होती. ‘काव्यांजली’, ‘कुल्फी कुमार बाजेवाला’, ‘भाभी’, ‘बहुरानी’, ‘कबूल है’, ‘चंद्र नंदिनी’ या टीव्ही मालिकांमध्येही त्यांनी काम केले होते. ’कुल्फी कुमार बाजेवाला’ मालिकेतील त्यांची बेबे ही भूमिका विशेष गाजली. मधल्या काळात त्या बॉलीवूडपासून दूर होत्या. बर्‍याच वर्षांनी त्या सलमान खानच्या ‘बॉडीगार्ड’ चित्रपटात दिसल्या होत्या. मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. हृदयाचा आजार बळावल्याने डॉक्टरांनी त्यांना अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला होता, मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी अँजिओप्लास्टी करण्यास नकार दिला होता. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply