Breaking News

हार्बरमार्गे पनवेल-गोरेगाव लोकल एप्रिलपासून धावणार!

प्रवासी संघाचा यशस्वी पाठपुरावा

पनवेल : रामप्रहर वृत्त
हार्बर मार्गावरून पनवेलहून अंधेरीपर्यंत असणारा लोकल प्रवास आता गोरेगावपर्यंत करता येणार आहे. या मार्गावरील लोकलसेवा येत्या एप्रिल महिन्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
पनवेल ते गोरेगाव विस्तारीकरण करताना जोगेश्वरी, गोरेगाव येथे लोकल उभी करण्यासाठी जागेचा अभाव आणि तांत्रिक अडचणी येत होत्या. अखेर या अडचणींवर उपाय शोधण्यात आले आहेत. याला पश्चिम रेल्वे प्रशासनाची मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे पनवेल ते गोरेगाव लोकल सुरू होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
पनवेलहून प्रवासी अंधेरीपर्यंत प्रवास करतात, मात्र गोरेगावकडे जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने पश्चिम रेल्वेचा वापर करावा लागतो. आता हार्बरवरून गोरेगावपर्यंत लोकल सुरू होत असल्याने प्रवाशांना दिलासा मिळेल. 25 मार्च किंवा 1 एप्रिल रोजी पनवेल रेल्वेस्थानकावरून पहिल्या पनवेल-गोरेगाव लोकलला हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. यासाठी पनवेल येथील प्रवासी संघाने प्रयत्न केले होते. 

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply