Breaking News

प्लेसिसची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

जोहान्सबर्ग : वृत्तसंस्था
दक्षिण आफ्रिका संघाचा दमदार फलंदाज फाफ डु प्लेसिस याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने हा निर्णय जाहीर केला. पाकिस्तान दौर्‍यावर आफ्रिकेच्या संघाला कसोटी मालिकेत 2-0 असा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर प्लेसिसने निवृत्ती स्वीकारली आहे.
फाफ डु प्लेसिसने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो पोस्ट केले आणि आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘माझ्यासाठी असा निर्णय घेणे खूपच कठीण होते, पण भविष्याचा विचार करून आणि नव्या आव्हानांना तोंड देण्याच्या उद्देशाने मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करतो. 15 वर्षांपूर्वी मला कोणी सांगितले असते की मी आफ्रिकेकडून 67 कसोटी सामने खेळणार आहे आणि काही सामन्यांचे नेतृत्व करणार आहे, तर माझा माझ्यावर विश्वास बसला नसता, पण आता पुढील दोन वर्षांत दोन टी-20 विश्वचषक आहेत. त्या स्पर्धांवर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने मी कसोटी क्रिकेटला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे,’ अशा आशयाचे पत्र त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply