Breaking News

मोरे महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींची रोहा एमआयडीसीला क्षेत्रभेट

रोहे : प्रतिनिधी

तालुक्यातील धाटाव येथील एम. बी. मोरे महिला महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या तृतीय वर्ष वर्गातील विद्यार्थिनींची रोहा एमआयडीसीमधील बेक केमिकल्स येथे 4 आणि 5 फेब्रुवारी रोजी शैक्षणिक क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती.

या विद्यार्थिनींना ’पाणी शुद्धीकरण प्रक्रिया’ या सर्टिफिकेट कोर्स अंतर्गत क्षेत्रभेटीमध्ये प्रत्यक्ष कंपनीच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची माहिती देण्यात आली.  बेक केमिकल्सचे प्लांटचे प्रमुख संतोष अधिकारी आणि कर्मचारी अमित पाटील, किरण मोरे यांनी प्लांटच्या कामासंबंधी प्रात्यक्षिक दिले आणि प्लांटवरील केल्या जाणार्‍या दैनंदिन नोंदीची माहिती दिली.

महाविद्यालयाच्या 35 विद्यार्थिनींसह प्रा. प्रतीक्षा घारगे, प्रा. निकिता महाडिक, प्रा. प्रतिमा भोईर आणि प्रा. ममता बिंद यांनी क्षेत्रभेटीत सहभाग घेतला होता. प्राचार्य प्रसन्न म्हसळकर आणि सर्टिफिकेट कोर्स कमिटीच्या प्रमुख प्रा. प्रतीक्षा घारगे यांनी या क्षेत्रभेटीचे नियोजन केले होते.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply