Breaking News

आदिवासींना धान्य वाटप

स्वराज्य सोशल वेल्फेअर ऑर्गनायझेशनची दिवाळी भेट

कर्जत : बातमीदार

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई स्वराज्य सोशल वेल्फेअर ऑर्गनायझेशन या संस्थेतर्फे कर्जत तालुक्यातील वारे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील करकुल व विकासवाडी या दोन आदिवासी वाड्यांमधील सुमारे 70कुटुंबाना धान्य आणि मास्कचे वाटप करण्यात आले.

करकुल व विकासवाडी या दोन आदिवासी वाड्यांमध्ये  एकूण 70 कुटुंबे आहेत. कोरोनाच्या काळात मजुरी मिळणेही मुश्किल झाल्याने या आदिवासींवर मोठं संकट आले आहे. अशा परिस्थितीत मुंबईतील स्वराज्य सोशल वेल्फेअर ऑर्गनायझेशनने या दोन्ही वाड्यांमध्ये आरोग्यदायी दिवाळी हा उपक्रम राबवायच ठरवले होते. त्यानुसार या दोन्ही वाड्यांमध्ये जाऊन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सुमारे 70 कुटुंबाना धान्य व मास्कचे वाटप केले. यावेळी नेरळचे सहाय्यक पोलीस अधिकारी अविनाश पाटील यांनी आदिवासींना दीपावलीचा फराळ व मुलांना खाऊचे वाटप केले.

स्वराज्य सोशल वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष विजय कोणार, संस्थेचे पदाधिकारी राकेश कदम, भूषण पेडणेकर, शुभांगी पेडणेकर, किशोर वेखंडे, यश वेखंडे, युवराज फरकते, मनिष सावंत, सुहास माने, कृष्णा शिंदे, भूषण जाधव, कल्लोळ चंदा, हितेश पाटील, महेश राणे, चंद्रकला राणे, नेरळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक तात्या सावंजी, हवालदार नाईक, राज्य आदर्श शिक्षक रवी काजळे, भागूचीवाडी शाळेचे मुख्याध्यापक हरिचंद्र आढारी यांच्यासह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply