Breaking News

पोपटी कविसंमेलनाची जागतिक ओळख व्हावी -अरुण म्हात्रे

पनवेल ः वार्ताहर

प्रतिभावंत, नवोदित कवींमुळे दिवसेंदिवस पोपटी कवी संमेलनाचा दर्जा उंचावत आहे. रायगडच्या मातीतल्या या पोपटी कवी संमेलनाची जागतिक स्तरावर ओळख व्हावी, असे मत ज्येष्ठ कवी अरूण म्हात्रे यांनी पनवेल येथे व्यक्त केले.

कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखा व उत्कर्ष सांस्कृतिक, कला आणि क्रीडामंडळ नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने तामसई (दुंदरे) येथे नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्या शेततळ्यात पोपटी कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. या पोपटी कवी संमेलनाचे उद्घाटन करताना कवी अरूण म्हात्रे बोलत होते.

या संमेलनाला कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्क प्रमुख रायगडभूषण प्रा. एल. बी. पाटील, नाट्य निर्माता विनोद नाखवा, ठाण्याचे माजी महापौर प्रेमसिंग राजपूत, नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, रायगड जिल्हा कोमसापच्या माजी अध्यक्षा सुनिता जोशी,गझलकार रंजन देव,कोमसाप नवीन पनवेल शाखेचेे अध्यक्ष गणेश कोळी, उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राकेश भुजबळ, उरण कोमसापचे अध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे, पाली कोमसापचे अध्यक्ष धनंजय गद्रे आदी उपस्थित होते. पोपटीचे विधीवत पूजन करून पोपटीला अग्नी देण्यात आला.

नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी, कोरोना काळात समाज आणि नाती दूर गेली होती. परंतु, या पोपटी कवी संमेलनात मराठी भाषा, कवी आणि काव्य यांचा उत्सवच साजरा झाला. काव्यप्रेमींनी कवितांचा आस्वाद आणि पोपटीची चव चाखत पोपटी कवी संमेलनाचा आनंद घेतल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले, तर कोमसाप नवीन पनवेल शाखेचेे अध्यक्ष गणेश कोळी यांनी, गेल्या अनेक वर्षांपासून कोमसाप नवीन पनवेल शाखेतर्फे पोपटी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. या कवी संमेलनात सुमारे 40 कवींनी सहभाग घेतला. त्यास उपस्थितांनी दाद दिली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply