Breaking News

कळंब जिल्हा परिषद गटात पोटनिवडणूक जाहीर

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील कळंब जिल्हा परिषद गटाचे सदस्य सुदाम पेमारे यांचे 28मे 2018 मध्ये निधन झाले होते. राज्य निवडणूक आयोगाने या गटाची पोटनिवडणूक जाहीर केली असून, येत्या 23 जून रोजी या जागेसाठी पोटनिवडणुक होणार आहे.

या जिल्हा परिषद गटामध्ये पाषाणे, मानिवली, पोशिर, साळोख, कळंब, वारे, ओलमण, नांदगाव, अंभेरपाडा, खांडस या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 2016 मध्ये झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कळंब गटात शेकाप-राष्ट्रवादी आघाडीचे सुदाम पेमारे  निवडून आले होते. मात्र  मताधिक्य प्रचंड कमी झाल्याने त्यांनी निकालानंतर नाराजी व्यक्त केली होती.

 कळंब जिल्हा परिषद गटात मागील काही वर्षात प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाने मोठे संघटन उभे केले आहे. शिवसेनादेखील काही ग्रामपंचायतवर आपले वर्चस्व राखून आहे. सेना-भाजप यांची युती काही ग्रामपंचायतीत आहे. काँग्रेसदेखील काही ठिकाणी आपले वर्चस्व राखून आहे. नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कळंब गटाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मुंबई मराठी पत्रकार संघाच्या नाट्यसंहितेचे पूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तमुंबई मराठी पत्रकार संघातर्फे यंदाच्या ६५व्या राज्य नाट्य स्पर्धेसाठी ‌‘ही परी अस्मानीची‌’ …

Leave a Reply