नवी मुंबई ः प्रतिनिधी
भाजप प्रभाग क्रमांक 32 तर्फे मोफत ई-श्रमकार्ड, हेल्थकार्ड, युनिवर्ल्सल कार्ड शिबिराचे आयोजन प्रमोदशेठ घरत, डी. आर. पाटील यांनी बोनसरी गाव या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये नागरिकांना नवी मुंबईचे माजी महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते सदर कार्ड वाटप करण्यात आले होते. या वेळी माजी नगरसेविका माधुरी सुतार, महिला संघटक निर्मला सुतार, भाजप नवी मुंबई ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष राजेश पाटील, समाजसेवक जयेंद्र सुतार, हनुमंत रोडे, वार्ड अध्यक्षा सीमा रिडलांन, महिला बचत गट मार्गदर्शिका सायली चांदे, अनिता पाटील आणि विभागातील नागरिक उपस्थित होते.