Breaking News

चिवे आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील चिवे येथील अनुदानित आश्रमशाळेच्या दोन  विद्यार्थ्यांची महाराष्ट्र कबड्डी संघात निवड झाली आहे. हे दोघेही डिसेंबर महिन्यात छत्तीसगड येथे होणार्‍या 65व्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार आहेत. या निवडीमुळे चिवे आश्रमशाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

वाशीम येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत 14 वर्षे मुलांच्या गटात चिवे आश्रमशाळेतील खेळाडूंनी मुंबई विभागाचे नेतृत्व होते. या राज्य स्पर्धेत पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, मुंबई, लातूर औरंगाबाद या विभागांचा सहभाग होता. मुंबई विभागाने पुणे विभागास पराभूत केले, मात्र उपांत्य फेरीत लातूर संघासोबत निसटता पराभव झाला. या स्पर्धेत अष्टपैलू खेळ करीत चिवे आश्रमशाळेचे निलेश मोहन पारधी आणि करण घुटे यांनी निवड सदस्यांवर प्रभाव पाडला. त्यामुळे निवड चाचणीमध्ये त्यांची निवड करण्यात आली.

संस्थेचे अध्यक्ष रवींद्र लिमये, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक आणि प्रशिक्षक संदेश नथूराम पिंगळे, प्राथमिक विभाग मुख्याध्यापक जयवंत गुरव, यवस्थापक आर. आर. खोपडे, समाधान परबळकर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply