Breaking News

सीकेटी महाविद्यालयात महिला दिनानिमित्त विविध उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयात महिला विकास कक्ष आणि लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 8) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून व्याख्यान व महाविद्यालयाच्या प्राध्यापिका व शिक्षकेत्तर महिला कर्मचार्‍यांसाठी नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी लक्ष्मी कॉलेज ऑफ ऑप्टोमेट्री, पनवेलच्या उपप्राचार्या डॉ. विद्युत राजहंस या प्रमुख वक्त्या लाभल्या होत्या. डोळ्यांची निगा कशी राखावी, विविध नेत्रविकार, त्यावरील उपचारपद्धती याविषयी त्यांनी व्याख्यान दिले. या कार्यक्रमात 82 प्राध्यापिका व शिक्षकेत्तर महिलांनी सहभाग घेतला. या वेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी, काम करणार्‍या महिलांना आधुनिक हिरकणीची उपमा देऊन सन्मानित केले. तसेच त्यांनी सर्व महिलांचे गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन स्वागतही केले. महिला विकास कक्षाच्या प्रमुख डॉ. रत्नप्रभा म्हात्रे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जागतिक महिला दिनाचा उदय व त्याचे महत्त्व सांगितले.

कार्यक्रमाला आयक्यूएससी. समन्वयक डॉ. बी. डी. आघाव, रुसा समन्वयक डॉ. शैलेश वाजेकर यांची विशेष उपस्थिती लाभली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. सोनाली हुद्दार, प्रा. पूजा दांडगे व प्रा. भावेश भोईर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन महिला विकास कक्षाच्या माजी अध्यक्षा डॉ. स्मिता भोईर यांनी केले. कार्याक्रमचे सूत्रसंचलन महिला विकास कक्षाची विद्यार्थिनी प्रतिनिधी प्रतिभा पाटील हिने केले.

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर आणि सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply