Breaking News

गुळसुंद्यात ज्येष्ठांसाठी स्मार्ट कार्ड शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त

उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त गुळसुंदे येथील प्राथमिक शाळेत गुळसुंदे, लाडिवली, आकुळवाडी आणि तुराडे या गावातील ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासासाठी स्मार्ट कार्ड काढून देण्याच्या शिबिराचे आयोजन गुरुवारी (दि. 15) करण्यात आले होते.

गुळसुंदे जिल्हा परिषद विभागामध्ये सहा दिवसांचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. गुळसुंदे पंचायत समिती गणात तीन दिवस व पोयंजे पंचायत समिती गणात तीन दिवस हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात स्मार्ट कार्ड घेतल्यानंतर त्यांना एक छत्रीसुद्धा देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला भाजपचे गुळसुंदे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. अविनाश गाताडे, सरपंच हरिश बांडे, उपसरपंच शांताराम मालुसरे, ग्रामपंचायत सदस्य मनोज पवार, प्रभावती कालेकर, भाजप लाडिवली गाव अध्यक्ष प्रकाश शेडगे, युवा मोर्चा लाडिवली अध्यक्ष हर्षद कालेकर, प्रल्हाद मांडवकर, चंद्रहास गोठळ, महिला मोर्चा तुराडे अध्यक्ष दीपिका ठाकूर, युवा कार्यकर्ते सतीश ठाकूर, प्रतीक भोईर, प्रफुल पाठारे, रमेश मालुसरे आदी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply