Breaking News

वीर तायक्वांदो अकॅडमीचे यश

पनवेल ः रामप्रहर वृत्त

रायगड तायक्वांदो असोसिएशनतर्फे खांदा कॉलनीतील न्यू होरायझन पब्लिक स्कूल येथे 20वी ज्युनियर रायगड डिस्ट्रिक्ट चॅम्पियनशिप झाली. या स्पर्धेत वीर तायक्वांदो अकॅडमीने घवघवीत यश प्राप्त केले स्पर्धेत वीर तायक्वांदो अकॅडमीच आयन शेख, विदेश वास्कर, पार्थ जाधव, अर्जुन करातगी, आदित्य रामरामे, निहाल भोईर यांनी सुवर्णपदक, तर हुसेन शेख व मेहेक खान यांनी रौप्यपदक पटकाविले. प्रशिक्षक संजय भोईर, हेमंत कोळी, प्रज्ञा भगत व संदीप भगत यांच्या मार्गदर्शनाखाली वीर तायकांडो अकॅडमीच्या खेळाडूंनी हे यश मिळवले. अकॅडमीचे अध्यक्ष हरेश्वर भगत यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी आणि राज्यस्तरीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply