Breaking News

कबड्डी स्पर्धेत मजगाव संघ विजेता

मुरूड ः प्रतिनिधी

येथील श्री काळभैरव क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेत भैरवनाथ मजगाव संघाने विजेतेपद पटकाविले. त्यांनी अंतिम सामन्यात वादळ खारीकवाडा संघावर आठ गुणांनी मात केली. मुरूड तालुक्यातील 20 संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. सामने रंगतदार झाले. तृतीय क्रमांक बापुजीदेव जोसरांजण आणि चतुर्थ क्रमांक श्री गणेश आदाड संघाने मिळविला. विजेत्या संघांना रोख रक्कम व चषक देण्यात आले. सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून रोजित माळी (मजगाव) सर्वोत्कृष्ट पकडपटू म्हणून नागेश माळी (खारीकवाडा), सर्वोत्कष्ट चढाईपटू केतन पाटील (जोसरांजण), तर शिस्तबद्ध संघ म्हणून राधाकृष्ण संघ नवीवाडी यांना गौरविण्यात आले.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply