Breaking News

मुरूडमधील क्रिकेट स्पर्धेत भोगेश्वर पाखडी संघ अव्वल

मुरूड ः प्रतिनिधी

मुरूड जुनीपेठ येथील शिवशक्ती क्रिडा मंडळाच्या वतीने क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मुरूड भोगेश्वर पाखाडी सिद्धिविनायक संघाने बाजी मारली, तर शेगवाड्यातील आर्यन संघ उपविजेता ठरला. स्पर्धेत शहरी व ग्रामीण भागातून मिळूण एकूण 28 संघांनी सहभाग घेतला होता. या वेळी माजी नगरसेवक गिरीश साळी, सामाजिक कार्यकर्ते विकास भाटकर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण, श्रीराम जामकर, रूपेश जामकर, मंदार कोलवणकर, ऋषि पोतदार, श्रीकांत मिठाग्री, ओंकार पोतदार, ओंकार चोडणेकर, संदीप पोतदार, सचिन कोलवणकर, रूपेश भाटकर, जयेश चोडणेकर, गणेश पोतदार, महेंद्र मुनेकर, दिलीप जामकर, अनंत खेडेकर, सचिन करंदेकर, बंटी पानकर, सौरभ तेलंगे, विशाल कोलवणकर, प्रथमेश पानकर, सिद्धेश कोलवणकर अंकेश कोलवणकर, प्रकाश चव्हाण, मोहन करंदेकर, तेजस तेलंगे, ओमकार तेलंगे, आदित्य तेलंगे, ऋषिकेश कोलवणकर, आदित्य वाडकर, दिपेश टक्के आदी उपस्थित होते. विजेत्यांना रोख रक्कम व चषक असे बक्षीस देण्यात आले, तर प्रत्येक सहभागी संघाला पदक व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. सर्वसाधारणपणे दिवाळीनंतर थंडीच्या मोसमात रायगड जिल्ह्यात क्रिकेटच्या स्पर्धा होतात. त्याच जानेवारीपर्यंत चालतात, पण यंदा मार्च सुरू झाला तरीही स्पर्धा होत असल्याचे दिसून येत आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply