Breaking News

महिला पोलिसांना आठ तास ड्युटी

पोलीस आयुक्तांची महिला दिनी अनोखी भेट

पनवेल : रामप्रहर वृत्त

महिला दिनानिमित्त नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात झालेल्या कार्यक्रमात महिला पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना आठ तास ड्युटी केल्याची घोषणा पोलीस आयुक्तांनी केली. त्यामुळे कौटुंबिक जबाबदारी सांभाळून कर्तव्य बजावणार्‍या महिला पोलिसांना दिलासा मिळाला आहे.

महिला दिनानिमित्त महिला पोलीस कर्मचारी व अधिकार्‍यांनी जनजागृतीपर दुचाकी रॅलीचे आयोजन केले होते. या वेळी वाहतूक नियमांचे महत्त्व आणि त्याविषयी जनजागृती करण्यात आली. विशेष दुचाकी रॅली परिमंडळ एक आणि दोनमधून काढण्यात आली.

पोलीस आयुक्तालयातील 100 पेक्षा अधिक महिला कर्मचारी व अधिकार्‍यांनी या दुचाकी रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. याबाबत माहिती देताना, महिला पोलीस कर्मचारी व अधिकार्‍यांना फक्त 8 तासांची ड्युटी लागू करण्यात असल्याचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी जाहीर केले. तसेच महिला दिनानिमित्त सर्व पोलीस नवी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदभार महिला पोलिसांकडे देण्यात आला होता.

याशिवाय शहरातील 10 पेक्षा अधिक आणि सर्वात व्यस्त वाहतूक नियंत्रक येथील वाहतूक नियंत्रण महिला पोलिसांच्या हाती सोपवण्यात आले. विविध उपक्रम राबवत महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

परिमंडळ एकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक-मोराज सर्कल-पाम बीच-खारघर चौक अशी काढली. तर परिमंडळ दोनमध्ये सीबीडी उत्सव चौक ते ग्रामविकास भवन कळंबोली सर्कल पनवेल बस स्थानकापर्यंत रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये महिला अधिकारी व कर्मचार्‍यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

महिला दिनाचे औचित्य साधून या पुढे महिला पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे कार्यालयीन तास केवळ आठ तासांचे असणार आहेत. या निर्णयांनी त्यांच्यातील आत्मविश्वास वाढून अधिक कार्यक्षमतेने काम करतील. महिला पोलीस म्हणूनही कुठेही कमी नाही हा विश्वास आम्हाला आहे.

-बिपीनकुमार सिंह, पोलीस आयुक्त, नवी मुंबई

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply