गव्हाण ः वार्ताहर
महिलांनी एकजुटीने वज्रमूठ बांधून संघशक्ती उभी करावी, असे आवाहन पनवेल तालुका पंचायत समिती सदस्या व भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत यांनी केले.
बुधवारी (दि. 8) रोजी सायंकाळी उशिरा रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या माता-पालक मेळाव्यात त्या बोलत होत्या.
या मेळाव्यास विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच माई भोईर, ग्रामपंचायतीच्या सदस्या योगिता भगत, शिल्पा कडू, कामिनी कोळी, उषा देशमुख, सुनिता घरत, गिरिजाबाई कातकरी, प्रतिभा भोईर, लीना पाटील, वर्षा नाईक, सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या प्राचार्या मुक्ता खटावकर, मोरू नारायाण म्हात्रे विद्यालयाच्या प्राचार्या प्रणिता गोळे, न्हावे येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या एस. सी. म्हात्रे, विद्यालयाच्या महिला शिक्षकांच्या प्रतिनिधी द्रोपदी वर्तक, मनिषा ठाकूर, सुनिता कांबळे तसेच माता- पालक संघाच्या सचिव ज्योती माळी, पालक उपस्थित होते. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक सुनील गावंड यांनी संगीतबद्ध केलेले महिलांचे सन्मान करणारे गीत विद्यार्थ्यांनी सादर केले.
या वेळी कर्तृत्ववान महिलांचा सन्मानही करण्यात आला.विद्यालयातील उपक्रमशील उपशिक्षिका हर्षदा पाटील यांनी दिग्दर्शित केलेला ’उंच माझा झोका’ हा विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणार्या कर्तृत्ववान महिलांच्या व्यक्तिरेखा साकारणारा कार्यक्रम बालकलाकारांनी सादर केला. विद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख ज्योत्स्ना ठाकूर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.