पनवेल ः प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या सुकापूर ग्रामपंचायतीच्या सदस्या पूनम भगत यांचा वाढदिवस गुरुवारी सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. वाढदिवसानिमित्त सिमरन ग्रुप या सामाजिक संस्थेतर्फे सुकापूर येथील गोरगरिबांना अन्नदान करण्यात आले.
या कार्यक्रमाला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट देत पूनम भगत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
नवीन पनवेल येथील राजीव गांधी मैदानाजवळील भाजपच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सुकापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच दिवेश भगत, माजी उपसरपंच बुवाशेठ भगत, सिमरन गु्रप अध्यक्ष प्रमोद भगत, दिपक भगत, शशिकांत भगत, महादेव गडगे, प्रकाश पोपेटा, अॅड. रविंद्र केणी, ग्रामपंचायत सदस्या कविता पोपेटा, ज्योती केणी, पुष्पा म्हस्कर, माजी सदस्या भारती भगत, शामली भगत, विकास तळेकर, उदय म्हस्कत, सागर भोपी, राम फडके, सयरेश भगत, विवेक पाटील, तौसिक दलवाई, अजय सैनिक, इश्वरी केणी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी पूनम भगत यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.