पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि तहसीलदार कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत नागरी संरक्षण दलाचे कुरकुटे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे उद्घाटन निवासी नायब तहसीलदार संजीव मांडे यांनी केले. यानंतर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी महाविद्यालयाच्या किर्तीबाबत भाष्य केले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. सुर्यकांत परकाळे यांनी, महाविद्यालात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आयोजित केल्या जाणार्या उपक्रमांचा मागोवा घेतला. कार्यशाळेत कुरकुटे यांनी दोरी, गाठी, झोळीचे प्रकार, जखमींसाठीची प्रथमोपचार पद्धती याबाबत उपस्थितांचा सहभाग घेऊन प्रात्याक्षिके सादर केली.
कार्यशाळेच्या दुसर्या दिवशी स्ट्रेचरचे प्रकार, त्यांचे उपयोजन याबाबत मार्गदर्शन केले. याबरोबरच पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त (मुख्यालय) विठ्ठल डाके यांनी, महिला सक्षमीकरण व मतदार जागरूकता याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. सुर्यकांत परकाळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश साठे, प्रा. सत्यजित कांबळे, डॉ. योजना मुनिव, प्रा. सागर खैरनार, प्रा. अपूर्वा ढगे, प्रा. आकाश पाटील तसेच तहसील कार्यालयातील कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
कार्यशाळेच्या आयोजनासाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थ्येचे सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.