चौलच्या ताडगोळ्यांना पर्यटकांची पसंती

रसरशीत, आरोग्यदायी फळविक्रीतून स्थानिकांना रोजगार उपलब्ध

रेवदंडा : प्रतिनिधी

चौलमधील ताडगोळे पर्यटकांची खास पसंती असून याची मोठी मागणी ऐन उन्हाळ्यात असते. चौल परिसरात ताडगोळ्यांची असंख्य झाडे असून ताडगोळे विक्रीतून मोठे उत्पन्न स्थानिक साधतात.

ऐन उन्हाळ्याच्या दिवसात ताडगोळे यांना थंडावा म्हणून पसंती असते.त्यामुळेच मुंबई, पुणे, ठाणे आदी शहरातून तसेच परिसरातून आलेले पर्यटक तसेच स्थानिकवर्ग ताडगोळे खरेदी करत असल्याचे चित्र रेवदंडा-चौल बाजारपेठेत दिसत आहे. चौलमध्ये नारळ पोफळीच्या बागेसह ताडाची झाडे सुध्दा विपूल असून त्याला येणार्‍या नारळासारख्या फळांना ताडगोळे म्हणतात. या फळांतला गर पाणीदार व चवदार असून उंच-उंच ताडाच्या झाडावर चढून काढण्याचा व फळांतील गर काढण्यास कस लागतो. उन्हाळ्यात येत असलेल्या ताडगोळयांना बाजारात चांगली मागणी असते.

उन्हाळयाचे दिवसात अंगाची लाही लाही होत असताना नैसर्गिक थंडावा देणारे ताडगोळे शरिरातील पाण्याचे प्रमाण टिकवून धरतात. अंगातील उष्णता कमी करणार्‍या ताडगोळयांचे आयुर्वेदातही अनेक औषधी उपयोग सांगितले आहेत. ताडगोळे हे फळ ठराविक ॠतूमध्ये म्हणजे उन्हाळ्यात उपलब्ध असणारे फळ आहे. यांची चव काहीशी शहाळयांतील मलई सारखी लागते. चवीला हे फळ फारच मधूर असते. इंग्रजी भाषेत ‘आईस अ‍ॅपल’ म्हणून ओळखले जाणारे फळ आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गुणकारी असल्याचे म्हटले जाते.

या फळाच्या सेवनाने शरिराला आवश्यक असलेले क्षार व इतर पोषक तत्वे संतुलित मात्रेमध्ये मिळत असतात. ज्यांना त्वचेवर उन्हाळ्यात सतत पुरळ येत असेल, तसेच ज्यांना या दिवसात चेहर्‍यावर मुरूमे येत असतील, त्यांच्यासाठी या फळाचे सेवन उत्तम आहे. या फळामध्ये कर्करोग प्रतिरोधी तत्वे असून विशेषतः महिलांमध्ये आढळणार्‍या स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी या फळाचे सेवन उत्तम मानले जाते.

Check Also

Zimpler Casinos fifty+ Finest Casinos double tigers slot on the internet Taking Zimpler

Articles Double tigers slot: Could there be one support service to contact?: Guide away from …

Leave a Reply