‘रयत’च्या लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर यांचे उद्गार
गव्हाण ः वार्ताहर
रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर पाठीशी उभे राहिले. त्यांच्या आशीर्वादामुळेच माझा रयतमध्ये सन्मान झाला, अशी प्रतिक्रिया रयत शिक्षण संस्थेच्या नवनियुक्त लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर यांनी व्यक्त केली.
लाईफ वर्करपदी निवड झाल्यानंतर येथील रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी त्या बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या, विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन अरुणशेठ भगत, प्राचार्य साधना डोईफोडे, ग्रंथपाल महेश म्हात्रे यांनीही मोलाचे सहकार्य केले, त्याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
या सत्कार समारंभास विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य तसेच रयत को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक प्रमोद कोळी, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य रविंद्र भोईर, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक जगन्नाथराव जाधव, पर्यवेक्षक दीपक भर्णुके, ज्युनिअर कॉलेज विभागाचे प्रमुख प्रा. बाबुलाल पाटोळे व इतर सेवक उपस्थित होते.