पनवेल : रामप्रहर वृत्त
जागतिक महिला दिनाच औचित्य साधून महानगरपालिका प्रभाग 3 येथे भाजप युवा मोर्चाध्यक्ष विनोद घरत यांनी प्रभागातील गुणवंत अशा 15 महिलांचा यथोचित सत्कार केला. याप्रसंगी आपले विचार मांडताना त्यांनी, जबाबदारीने संसार चालविणार्या महिलांच्या कामाचे कौतुक केले. या वेळी सारिका जाधव, प्रीती दिघे, नूतन डांगळे, जयश्री सूर्यवंशी, सरोजनी नायर, सुधा सेल्वन, सपना नाईक, अनिता राजभर, रेणुका केणरे, शुभांगी गायकवाड, लक्ष्मी राव, जरीन अल्फाज, काव्या आंबीरे, राखी शर्मा आदींचा सत्कार केला. भाजप खारघर मंडलाचे सरचिटणीस दीपक शिंदे यांनी महिलांना त्यांचे सामर्थ्य व कमकुवतपणा यावर लक्ष देऊन मुलांना संसारक्षम व देशप्रेम घडवून आणण्याचे आवाहन केले.
या वेळी विनोद घरत यांच्यासह भाजप सरचिटणीस दीपक शिंदे, अनिल कदम, आयटी सेलचे संयोजक रूपेश चव्हाण, युवा मोर्चा उपाध्यक्ष शुभ पाटील, खजिनदार प्रमोद पाटील व वामन म्हात्रे उपस्थित होते.