Breaking News

रायगडात मास्क कारवाई न करण्याचा आदेश मागे

अलिबाग ः प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात मास्क न लावणार्‍यावर कायदेशीर कारवाई केसेस बंद करण्याचा निर्णय रायगड पोलिसांनी मागे घेतला आहे. त्यामुळे मास्क न लावता फिरल्यास आता पुन्हा नागरिकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. जिल्हा सुरक्षा विभागाने काढलेल्या पत्रामुळे जिल्ह्यात गैरसमज निर्माण झाला होता. त्यामुळे काढलेले पत्र मागे घेत असल्याचे जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक अतुल यांनी पत्राद्वारे सर्व पोलीस ठाणे प्रभारी, वाहतूक पोलीस आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना पत्र काढले आहे. कोव्हीडच्या नियमांचे पालन व्हावे, कोरोनाचा प्रसार होऊ नये याची दक्षता घेऊन कारवाई करा, असेही पत्रात म्हटले आहे.

रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक याच्या आदेशानुसार जिल्हा सुरक्षा विभागाचे राजन जगताप यांनी सोमवारी (दि. 7) सर्व पोलीस ठाणे अधिकारी, वाहतूक अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांना मास्क न लावता फिरणार्‍या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करू नका, असे पत्र दिले होते. मात्र याबाबत जिल्ह्यात गैरसमज निर्माण झाल्याने कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होऊ लागले होते.

याबाबत जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी शुक्रवारी (दि. 11) सुरक्षा शाखेने काढलेले पत्र मागे घेत असल्याचे पत्र काढले आहे.

   पोलिसांनी काढलेल्या आधीच्या आदेशाने जिल्ह्यात मास्क न लावणार्‍याची संख्या वाढू लागली. मात्र त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिसांनी काढलेल्या आदेशाने गैरसमज निर्माण झाला होता. मात्र आता आदेश मागे घेतल्याने मास्क न लावणार्‍यावर दंडात्मक कारवाई होणार आहे. त्यामुळे मास्क लावा आणि दंडा पासून मुक्ती मिळवा अशी बोलण्याची वेळ रायगड करावर आली आहे.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply