Breaking News

शेलू येथे मास्क घालून बाळाचे बारसे

कर्जत : बातमीदार
कोरोनाचा विषाणू संसर्गाने पसरत आहे. शहराच्या तुलनेत याचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात कमी आहे, पण तरीही सावधगिरी बाळगत शेलू येथे नवजात बाळाचे मास्क घालून बारसे करण्यात आले.
चीनमधून पसरलेल्या कोरोनाने संपूर्ण जगात आपली दहशत निर्माण केली आहे. या विषाणूवर अजूनही लस व औषधोपचार उपलब्ध नसल्याने संसर्ग टाळणे आणि खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे अनेक कार्यक्रमांवर संक्रांत आली आहे. कर्जत तालुक्यातील शेलू येथील आत्माराम दुर्वास मसणे यांच्या घरी नुकताच एका बाळाचा जन्म झाला. त्यांच्यासाठी हा आनंदाचा क्षण होता, पण कोरोनाचा धोका लक्षात घेऊन पुढील विधीवत कार्यक्रम कसे करावे हा प्रश्न त्यांच्यासमोर होता, परंतु त्यांनी यावर
नामी शक्कल लढवत आपल्या बाळाचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने बारसे केले.
अंकिता व आत्माराम मसणे या पालकांनी नवजात बाळाचे मास्क घालून बारसे केले, तसेच बारशासाठी आलेल्या महिलांनाही मास्कचे वाटप केले. मास्क व सॅनिटायजरचा वापर करून बारशाच्या घरगुती सोहळा झाला.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply